जेवढे मोठे कुंकू तेवढे जास्त नवरे – जयदीप कवाडे

देशात नाही तर संपूर्ण जगात ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आज महिलांच्या सम्मानासाठी अनेक चित्रपट,नाटक आणि वेगवेगळ्या माध्यमातून महिलांच्या रक्षणाची आणि त्यांच्या सम्मानची जबाबदारी घेतली जात आहे. परंतु आज निवडणुकीला तर प्रत्येक पक्षात आरोप-प्रत्यारोप होत असतात पण या निवडणुकीच्या कार्यकाळात महिलां बद्दल समानपूर्वक भाषा वापरणे हे सुद्धा पुढाऱ्यांचे महत्वाचे काम आहे. महिलांच्या कपाळावर जेवढे मोठे कुंकू तेवढे नवरे जास्त असतात अशी टीका पीपल रिपब्लिकन पक्षाचे नेते जयदीप कवाडे यांनी भाष्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात जिल्ह्धिकारी कार्यलयाकडे तक्रार सुद्धा करण्यात आलेली आहे.

काँग्रेस उमेदवार नाना पाटोळे यांची प्रचार सभा कुंभार टोळी येथे झाली. या सभेत कवाडे यांची जीभ घसरून केंद्रीय मंत्री स्मुर्ती इराणीं यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली होती. स्मृती इराणी कपाळावर मोठे कुंकू लावतात ज्याचे कपाळावरील कुंकू मोठे त्याचे नवरे जास्तच असतात अशी टीका कवाडे यांनी केली होती तसेच नाना पाटोळे यांनी त्यांची पाठ थोपटून या गोष्टीचे सर्मथन सुद्धा केले होते. आज नाना पाटोळे यांनी कवाडे यांचे समर्थन करून कुठे तरी महिलांचा अनादर केला आहे . ज्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद एका महिलेने भूषविलेले असताना त्यात काँग्रेस पक्षाची संस्कृती समोर येत आहे. आज कवडेंचे वक्त्यव्य आणि त्यांचे समर्थन करणारे नाना पाटोळे यांनी समस्त महिलांचा अपमान केला आहे. तसेच आचार साहितेच भंग केल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here