राज ठाकरे यांच्या या आदेशामुळे मनसेचे काकर्यकर्ते नाराज

आगमी लोकसभा निवडणुकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येणाऱ्या निवडणुकीला न उतरण्याचे जाहीर केले आहे. परंतु आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मोदी आणि भाजपा पक्षा विरुद्ध कामं करण्याचे आव्हानच केले आहे. केंद्रातील मोदी सरकारचा पराभव होण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मते देण्यास सांगितले आहे. इतक नव्हे तर आघाडीचे उमेदवार निवडूण येतील यासाठी काम करण्याचे आदेश राज यांनी दिले आहेत. पण मनसेचे सर्व सामान्य कार्यकर्ते आणि मतदार राज ठाकरे यांच्या या निर्णयावर नाराज आहेत.

भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर राज ठाकरे सातत्याने टीका करत आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला होता. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी राज यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास सांगितले आहे. अशा प्रचाराचा आदेशच राज यांनी समर्थक, कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे. पण राज यांचा निर्णय पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आवडला नाही आहे. मागील निवडणुकीला ज्यांच्या विरोधात भूमिका मांडली आज त्याच्या प्रचाराला जाणे म्हणजे आपलेच हसू करून घेण्यासारखे आहे असे सुद्धा मनसे कार्यकर्ते बोलून दाखवत आहे.

मुंबईतील भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी, शिवडी आणि वडाळासह मनसेचे कट्टर कार्यकर्ते राज यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नाराज आहेत. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांच्या मते, ते मुळचे शिवसैनिक आहेत. आम्ही जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हा धनुष्यबाण किंवा कमळासमोरील बटण दाबत होतो. त्यानंतर जेव्हा मनसेत आलो तेव्हा इंजिनला मत दिले. पण आतापर्यंत कधीच काँग्रेस वा राष्ट्रवादीला मत दिले नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला कार्यकर्ते पक्षाचा आदेश मानतात की आपल्या मूळ शिवसेना पक्षाला मदत करतात हे येणाऱ्या निवडणुकीला दिसून येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here