Skip to content Skip to footer

“तुम्हाला लाज कशी वाटत नाही” – विनोद तावडे

तुमच्या काळात सिंचन घोटाळा झाला, त्याची लाज कशी वाटत नाही. आदर्श घोटाळयांमुळे अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्री पद गेले त्याची लाज कशी वाटत नाही. शेतकऱ्यांनी धरणात पाणी नाही म्हणून पाणी मागितले तर करंगळी वर केली आणि वरून मुतू काय हे बोलताना त्याची लाज कशी वाटतं नाही. हे विचारायला लाज कशी वाटत नाही असा थेट हल्लाच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर चढवलेला आहे. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादींने “लाज कशी वाटत नाही” असे नवीन कॅम्पेन सुरु केले होते आणि भाजपा पक्षावर जोरदार हल्ला चढविला होता.

लाज कशी वाटत नाही अशी निवडणूक प्रचाराची टॅग लाइन करणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला दुसऱ्याला इतकी निगरगट्टपणे लाज कशी वाटत नाही असा सवाल कसा काय विचारू शकतात असे तावडे यांनी बोलून दाखविले. तावडे म्हणले गेल्या चार-साडेचार वर्षात आमच्या सरकारने विकासाची कामे केली, देशाची सुरक्षा वाढवली तसेच देशाची प्रगती वाढली याचा काँग्रेस पक्षाला अभिमान वाटला पाहिजे. हे सोडून कुठला पक्ष असा निरगिट्टपने प्रचार करू शकतो याचे आश्चर्य वाटते. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रथमच १० वर्षात शरद पवार आणि अजित पवार यांच्या विषयी चांगले शब्द काढले असे सुद्धा तावडे यांनी बोलून दाखविले.

शरद पवार यांना आपल्या घराण्याची कायजी वाटत नसले तरी अजित काय करतो, पार्थ काय करतो, रोहित काय करतो याची संपूर्ण माहिती शरद पवार हे ठेवत असतात. कुटुंब प्रमुख असल्यामुळे ते घरातील सर्व प्रश्न सोडवतीलच, परंतु नरेंद्र मोदी शरद पवार यांच्या विषयी चांगल्या गोष्टी बोलतात व राजकारणात ते आपल्याला आदर्श मानतात म्हणून आपल्या पवारांची चिंता करतात असा टोला सुद्धा तावडे यांनी पवारांना लगावला होता. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि पुढे विधानसभेला भाजपा आणि राष्ट्रवादीचे वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Leave a comment

0.0/5