Skip to content Skip to footer

दलितांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर रोष ?

देश स्वतन्त्र झाल्यावर देशात सर्वाधिकार सत्ता काँग्रेस पक्षाने उपभोगलेली आहे. देशाचे संविधान लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आहे. परंतु देशात राज्य करणाऱ्या काँग्रेस सरकारने कधीही फक्त मतांचे राजकारण करून वोट बँक म्हणूनच या दलित समाजाकडे पहिले आहे. आज संविधानाने दिलेले आरक्षण सत्तेत असल्यापासून संपवण्याचे काम या काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. आज दलितांना फसवण्याचे आणि आंबेडकरी चळवळीला देशोधडीला लावण्याचे काम याच सरकारने केलेलं आहे. दगलबाजी करताना सरंजामी-सामंती कुटुंबशाहीच्या नात्यागोत्याचे राजकारण करून दलितांना सत्तेत सहभागी करून न घेता त्यांच्यावर वरपासून खालपर्यंत राज्य मात्र काँग्रेसने केलं आहे. या कुटील काँग्रेसी डागण्या दलितांनी कशा विसराव्यात ?

राज्यात दलित समाजावर खेडोपाडी रानटी अत्याचार सातत्याने होत आले. खैरलांजीसारखे दलित महिलांवर बलात्कार करून त्यांचे मुडदे पाडणे, उच्चजातीय मुलींशी लग्न केले म्हणून कुणाचे डोळे फोडणे, कुणाला हालहाल करून मारणे, ग्रामीण भागात दलित ताठ मानेने वावरतात म्हणून त्यांच्यावर बहिष्कार टाकणे, दलित वस्त्यांवर हल्ले करणे असे शेकडो प्रकार काँग्रेसी राज्यात घडत आले आहेत; पण या शासनाने या अत्याचारांकडे दुर्लक्षच केले. शासनाच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील सवर्ण धनदांडग्यांना दलितांवर अत्याचार करताना कायद्याची भीती कधी वाटलीच नाही. उलट खैरलांजीप्रकरणी नागपूरला जेव्हा दलित युवकांच्या संतापाचा उद्रेक झाला, तेव्हा गृहमंत्री आर. आर पाटील यांनी दलितांचा नक्षलवादी लोकांशी संबंध जोडला.

ग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची उपेक्षा करतानाही कुठलीच हयगय केली नाही. उदा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठास देताना १७ वर्षे आंबेडकर आनुयायांना झुलवत ठेवले. अखेर तडजोडीतून विद्यापीठाचे नामांतर नव्हे, तर नामविस्तार केला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख समाजावर जे अत्याचार झाले, त्याबद्दल सोनिया गांधींनी शीख बांधवांची माफी मागितली; पण मराठवाड्यात नामांतर प्रकरणात खेडोपाडी दलित समाजावर जे अत्याचार झाले, त्याबाबत कोणा समाजवाद्याने, गांधीवाद्यांनी सोडाच; पण नामांतराचे जे कोणी ‘जाणते राजे’ शिल्पकार म्हणवतात त्यांनीसुद्धा दलित समाजाची कधी माफी तर सोडा, पण खेदही व्यक्त केलेला नाही. मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समाधी, ती राजधानी दिल्लीत नसल्यामुळे बाबासाहेबांचा समावेश राष्ट्रीय नेत्यांत करता येत नाही, असे केंद्र सरकारच्या बांधकाम विभागाने जाहीर केले होते. तेव्हा अशी ही आंबेडकरविरोधी काँग्रेस नाका-तोंडात पाणी जाऊन बुडत असेल, तर शोक कोणी व्यक्त करावा?

आज इतकी वर्ष काँग्रेस सरकार सत्तेत असून सुद्धा देशाचे संविधान लिहिलेल्या डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत बांधू शकत नाही. आज संविधानाने एसी, एसटी, ओबीसी आणि वीजेएनटी या जातील दिलेल्या आरक्षणाच्या कवचावर घाव घालण्याचे काम काँग्रेस सरकारने केलेलं आहे. आज राहुल गांधी दलित घरात जाऊन भाजी भाकरी खातात, परंतु औरंगाबाद येथे भेट दिल्यावर मराठवाडा विध्यापीठाला का बर भेट देत नाहीत ज्या विद्यापीठाचे उदघाटन खुद्द पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं आहे त्यामुळे काँग्रेस फक्त दलित प्रेमाचे नाटकच करत आहे आणि हा प्रेमाचा चढवलेला मुखवटा लवकरच गळून पडेल आणि काँग्रेस पक्षाचे खरे रूप दलित जनते समोर येईल.

n

Leave a comment

0.0/5