काँग्रेसने नागपुरात भंडाऱ्यावरुन पार्सल आणलं आहे, नुसतं राजीनामे देणं आणि पक्ष बदलणं, एवढंच राजकारण नाना पटोले यांनी केलं असून मी का त्यांच्यासाठी माझ्या तोंडाची वाफ वाया घालवू?’ अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नागपूर येथे भाजपा उमेदवार नितिन गडकरी यांच्या प्रचार सभेला देवेंद्र फडणवीस बोलत होते. काँग्रेस उमेदवार नाना पाटोळे यांनी आपल्या खासदार पदाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीला काँग्रेस पक्षाने त्यांना गडकरी यांच्या विरोधात नागपूर मतदार संघातून उभे केले आहे.
काँग्रेसने नागपूर मध्ये भंडाऱ्या वरून पार्सल आणले आहे. भंडाऱ्या मध्ये जाऊन विचारा तिथे एकतरी प्रकल्प किंवा कारखाना आणला आहे का ? नुसतं राजीनामा देणं आणि पक्ष बदलणं एवढेच राजकारण नाना पाटोळे यांनी केलेलं आहे असे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविले आहे. एवढ राजकारण नाना पाटोळे यांनी केले असून मी का तोंडाची वाफ वाया घालवू अशी टीका मुख्यमंत्री यांनी पाटोळे यांच्यावर कलेली आलेली आहे.