माझं स्वप्न हे देशासाठी; तुमचं स्वप्न फक्त खुर्चीसाठी- उद्धव ठाकरें

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर असून रामटेक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप, रिपाइं महायुतीचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्या प्रचारासाठी रविवारी जाहीर सभा घेतली. कळमेश्वर येथील कृषी बाजार समितीच्या मैदानात झालेल्या या प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी देशाच्या सुरक्षेसोबत खेळणाऱ्या विरोधकांवर जोरदार आसूड ओढले आहे. खासदार कृपाल तुमाने यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने रीटाइड आयएएस अधिकार गजभिये यांना उमेदवारी दिलेली आहे. परंतु गजभिये आधी बसपा पक्षाला सोडचिट्टी देऊन काही दिवसापूर्वीच काँग्रेस पक्षात प्रवेश करून आले होते त्यामुळे तेथील काँग्रेस पक्षातील जुने कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

पुढे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावर सुद्धा टीका केली. देशद्रोह्यांना फासावर लटकवणारे सरकार हवे की, देशद्रोह्यांना मांडीवर घेऊन खाऊ-पिऊ घालणारे सरकार हवे? असा प्रश्न सुद्धा जनतेला विचारला आहे. आज आपल्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा कायदा रद्द करून एक प्रकारे दशहतवादी कृत्यांना खत-पाणी घालण्याचे काम काँग्रेस करत असताना दिसत आहे. ज्या पक्षाचा प्रदेशाध्यक्षच म्हणतोय मला राजीनामा द्यावासा वाटतो आणि तो पक्ष सरकार स्थापनेचे स्वप्न बघतोय अशी घणाघात टीका सुद्धा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांच्यावर टीका केलेली होती. पाकिस्तानने जर का कुरापत काढली तर पाकिस्तानमध्ये घुसून ठोकू असं सांगणारे पंतप्रधान नुसते बोलून गप्प बसत नाही, तर दोन वेळा घरात जाऊन धडा शिकवून आले आहेत असे बोलून सर्जिकल स्ट्राईकचे आणि नरेंद्र मोदी यांचे सुद्धा समर्थन केले.

पुढे शेतकऱ्यांचे समर्थन करताना माझ्या शेतकऱ्याला योग्य हमीभाव मिळावा ही त्याची अपेक्षा आहे आणि ती देण्यासाठी शिवसेना आणि भाजपा वचनबद्ध आहेत असे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविले, जी काही ताकद आहे, जी काही शक्ती आहे, ती पूर्ण शक्ती मी पणाला लावेन पण शेतकऱ्यांची साथ कधी सोडणार नाही. रामटेक भगव्याचा बालेकिल्ला आहे आणि तिथे सुद्धा भगवाच फडकणार असा विश्वास सुद्धा बोलून दाखविला आणि माझे स्वप्न देशासाठी आहे आणि तुमचं स्वप्न फक्त खुर्ची आहे असा टोमणा सुद्धा विरोधकांना लगावला होता

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here