सिद्धिविनायक, बाबासाहेब, बाळासाहेबांना अभिवादन करुन दर्ग्यावर चादर, राहुल शेवाळेंचा अर्ज दाखल

दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना उमेदवार तथा खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. नामांकन अर्ज भरण्यापूर्वी राहुल शेवाळे यांनी आपल्या मतदार संघातील प्रमुख आणि महत्वाच्या स्थळांना भेटी देऊन आपला नामांकन अर्ज भरलेला होता. राहुल शेवाळे यांनी सकाळी १०.०० वाजता दादर प्रभादेवी सिद्धिविनायक येथे भेट देऊन दर्शन घेतले. त्या नंतर त्यांनी चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मुर्तीस अभिवादन करून पुढे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील मैदानात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मुर्तीस अभिवादन केले.

राहुल शेवाळे यांनी शिवाजी पार्क मधील विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मुर्तीस सुद्धा भेट दिली. मग पुढे काही अंतरावर जाऊन माहीम दर्ग्यात सुद्धा चादर चढवली. पुढे तेथून खासदार राहुल शेवाळे आपल्या कुटुंबा समवेत ओल्ड कस्टम हाऊस येथे आपले नामाकंन अर्ज भरण्यासाठी हजर झाले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना संसदरत्न खासदार राहुल शेवाळे यांनी आगामी निवडणूक गेल्या निवडणुकी पेक्षा सोपी आहे असे बोलून दाखविले. गेल्या निवडणुकीला नगरसेवक ते थेट खासदारकीला ते उतरले होते. गेल्या निवडणुकीला काँग्रेस विरोधात देशात लाट होती परंतु मागील पाच वर्षात केलेल्या कामगिरीवर पुन्हा मागच्या वेळेपेक्षा जास्त भरघोस मतांनी निवडणून येणार असा विश्वास सुद्धा बोलून दाखविला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here