आपल्याला पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. आपले पंतप्रधान कोण होणार तर एकच नाव पुढे येत आहे नरेंद्र मोदी तर विरोधी पक्षाकडे एकही नाव नाही असे उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविले. लातूर औसा येथे आज महायुतीची जाहीर सभा झाली आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह रिपाई नेते रामदास आठवले उपस्थित राहिले होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाच्या जाहीरनाम्यात शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात फक्त थापा आहेत.
गरिबी हटाव तुम्ही म्हणता तुमची हटली पण जनतेची कधी हटणार असा सवाल सुद्धा उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाला विचारला आहे. परिस्तानने कुरापती केल्यावर आपण त्यांनी घुसून ठोकतो. पाकीस्तानचा एकदाचा काय तो निकाल लावावा. मराठवाडयाच्या पाठीशी सरदार वल्लभभाई पटेल उभे राहिले आणि रझाकार निघून गेले. मराठवाडा मर्दाची भूमी आहे. त्यावेळी सुलतांनी होती आता अस्मानी आहे. त्यामुळे तुम्ही मराठवाड्याला मदत करा. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात विमा कंपनीची कार्यालय असली पाहिजे. असे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सभेला बोलून दाखविले होते.