Skip to content Skip to footer

राज ठाकरे घेणार महाराष्ट्रात सहा सभा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपा विरोधात सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपा पक्षाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेला राज ठाकरे यांनी आपल्या मनसे कार्यकर्त्यांना भाजपा विरोधात काम करण्याचे आव्हानच केले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात राज ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या प्रचार सभेतून भाजपा पक्षावर तोफ डागणार आहे. त्यामुळे राज ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे काम करताना दिसून येत आहे.

१४ एप्रिल पासून राज ठाकरे महाराष्ट्रात सभांचा धडाकाच सुरु करणार आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मतदार संघात म्हणजे नांदेड मध्ये राज ठाकरे यांची पहिली सभा होणार आहे. १४ एप्रिल ते १९ एप्रिल यांच्या पहिल्या प्रचार सभेचे नियोजन करण्यात येणार आहे. सर्व सभांचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतः कार्यकर्ते करणार आहे. असे मनसेतून सांगण्यात येत आहे

राज ठाकरे यांच्या सभा -:

१४ एप्रिल : नांदेड

१५ एप्रिल : सोलापूर

१६ एप्रिल : इचलकरंजी

१७ एप्रिल : कराड (सातारा)

१८ एप्रिल : खडकवासला

१९ एप्रिल : पण किंवा अलिबाग

Leave a comment

0.0/5