Skip to content Skip to footer

शरदराव तुम्ही फुटीरवादी नेत्यानं सोबत शोभत नाही – नरेंद्र मोदी

आज महायुतीची प्रचारसभा लातूरमधील औसा येथे पार पडली. या युती सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर चांगलेच शरसंधान साधले पण त्याच बरोबर त्यांनी कॉंग्रेसला वेठीस धरून पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका केली. काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान बनावा या विचाराच्या बाजुने काँग्रेस आहे. काँग्रेसने देशाची फाळणी केली. नाहीतर पाकिस्तान झालाच नसता. काँग्रेस देशविरोधी गोष्टींचं समर्थन करते आहे. देशात दोन पंतप्रधानांची मागणी करणाऱ्यांना काँग्रेस पाठिंबा देते. या मुद्द्यावरून मोदिनी शरद पवार यांना हे शोभत नाही असे म्हणत शरद पवारांवर निशाणा साधला. त्यामुळे येणाऱ्या दिवसात शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात वाद वाढण्याचे चिन्ह दिसून येत आहे.

मोदी म्हणाले, ‘आज शरद पवार तुम्ही फुटीरतावादी लोकांसोबत उभे आहात ‘शरदराव तुम्हाला हे शोभतं का? असा प्रश्न शरद पवारांना विचारला. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले ‘राजकारण ही वेगळी गोष्ट आहे मात्र शरद पवार तिकडे शोभत नाहीत’. अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पुढे ते म्हणाले की, दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. दहशतवाद्यांना त्यांच्या अड्ड्यात घुसून मारण्याची भारताची नवी नीती आहे. दहशतवाद संपवूनच आम्ही थांबणार असल्याचेही मोदी म्हणाले. दरम्यान, या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, ओमराजे निंबाळकर हे उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5