Skip to content Skip to footer

“मनसे आता झाली उनसे” मुख्यमंत्र्यांचा टोला

मनसे पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यानंतर मतदार नसलेली सेना झाली आणि आता उमेदवार नसलेली सेना झालेली म्हणजे उनसे झालेली आहे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे. काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी येणाऱ्या निवडणुकीला भाजपा विरोधात बाजू मांडणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच राज ठाकरे हे पूर्णपणे तणावग्रस्त झालेले आहेत असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना काढला. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात मतदान करा असे आवाहन राज यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलं होतं. तसेच हे सरकार हिटलरशाहीचे सरकार आहे. जर देशाची लोकशाही वाचवायची असेल तर मोदींना सत्तेतून खाली आणावं असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. तसेच ते महाराष्ट्रात पहिल्या टप्यात ६ ठिकाणी सभा घेणार आहे. या सभेला ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान कण्याचे आव्हान करणार असल्याचे समोर येत आहे..

राज ठाकरेंच्या भाजपाला केलेल्या टार्गेटमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला धारेवर धरले आहे. मागच्या वेळी देखील राज ठाकरे यांची स्क्रीप्ट बारामतीहून येते, राज हे बारामतीचे पोपट आहेत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता तर यावर राज यांनीही मुख्यमंत्र्यांवर हवा गेलेला फुगा अशा रितीने टीका केली होती. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा राजकीय सामना पाहायला मिळणार आहे. परंतु राज ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या बाजूने मांडणाऱ्या भूमिकेला महाराष्ट्रातील जनता स्वीकारेल काय हे येणाऱ्या दिवसात समोर येईल.

Leave a comment

0.0/5