Skip to content Skip to footer

मिलिंद देवरा जरा जपून बोला – उद्धव ठाकरे

दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ महालक्ष्मी रेसकोर्स येथे झालेल्या सभेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावर आपल्या शैलीत तोफ डागली होती. या सभेला खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात उभे असलेले मिलींद देवरा यांचा सुद्धा आपल्या शैलीत खरपूस समाचार घेतला होता. गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला होता. पण शिवसेनेनं युती केल्यानंतर काही जणांच्या पोटात दुखू लागलं आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती.

तसेच मिलिंद देवरा यांचा सुद्धा समाचार घेतला. ” मिलिंद देवरा आज पाळण्यात असतील नाहीतर गोधडीत असतील. त्यांच्या वडिलांना बाळासाहेबांनी ओळख दिली. त्यांना महापौर केलं. नाहीतर मुरली देवरांना कोणी ओळखलं असतं.’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ‘आता त्यांचं निधन झालं. त्यामुळे जास्त काही बोलत नाही. पण मिलिंद देवरा जरा जपूनच बोला” असा थेट इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच मुरली देवरा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संबंधाची आठवण सुद्धा करून दिली होती.

Leave a comment

0.0/5