Skip to content Skip to footer

राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील करणार भाजपा पक्षात प्रवेश?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या महाआघाडीला सुरुंग लागला आहे. काही दिवसापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी भाजपात प्रवेश करून नगर जागेवरून त्यांनी राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना आव्हान दिलेले आहे. तर विजयसिह मोहिते पाटिल यांचे पुत्र रणजीतसिह मोहिते पाटील यांनी काही दिवसापूर्वी भाजपा पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या दोन बड्या नेत्यांनी पक्षाला दिलेल्या सोडचिट्टीमुळे पक्षाला मतांचा फटका बसण्याचे चिन्ह नाकारता येणार नाही आहे.

नगर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या सभेला दि. १२ एप्रिल रोजी राधाकृष्ण विखे पाटील भाजपा पक्षात प्रवेश करणार आहे असे बोलण्यात येत आहे. तर १७ एप्रिलला विजयसिह मोहिते पाटील सुद्धा भाजपात प्रवेश करणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर अनेक बडे नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला राम-राम ठोकून भाजपा पक्षात प्रवेश करत आहे. काही दिवसापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी येणाऱ्या १५ दिवसात माझी भूमिका स्पष्ट करेल असे संकेत सुद्धा दिलेले होते. मी गोंधळलेलो नाही आहे माझी भूमिका स्पष्ट आहे असे मत सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविले होते.

विखे पाटलांचा खरा वाद हा सुजय विखे पाटील यांच्या नगर मधील जागेवरून निवडणुकीला उतरण्या वरूनच झाला होते. परंतु शरद पवार आणि अजित पवार यांनी आपल्या वाटेला आलेली जागा सुजय यांना न सोडता विखे पाटील आणि पवार यांच्या परिवारातील जुने वाद शरद पवार यांनी उकरून काढले होते. हा विषय विखे पाटलांनी काँग्रेस पक्ष प्रमुखांच्या कानावर सुद्धा घातला होता. परंतु त्यांच्याकडून सुद्धा काही प्रतिसाद न मिळाल्यामुळेच शेवटी विखे पाटलांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Leave a comment

0.0/5