Skip to content Skip to footer

‘शिरुरचा उमेदवार देताना पवार साहेबांनी जातीचा विचार केला की मातीचा’ : विनोद तावडे

शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘जातीसाठी नाही मातीसाठी मतदान करा’ असं आवाहन मतदारांना केले होते. या आवाहनाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रतिप्रश्न विचारला आहे. यावेळी बोलताना तावडे म्हणाले “शरद पवार बोलले की, जातीसाठी नाही तर मातीसाठी मतदान करा. शरद पवारांच्या तोंडी हे वाक्य ऐकल्यावर लोकांना माहित असतं, त्यामागे ते काय म्हणतात.”, असे म्हणत विनोद तावडे पुढे म्हणाले, “शिरुरचा उमेदवार देताना काय विचार केला होता? मातीचा केला होता का जातीचा केला होता?” असा प्रश्न शरद पवार यांना विचारला आहे.

काही दिवसापूर्वी प्रसार माध्यमांना खासदार अढलराव पाटील यांनी दिलेल्या मुलाखतीचा वीसपर्यास करून पाटील यांनी कोल्हे यांची जात काढली म्हणून राष्ट्र्वादीने टार्गेट केले होते परंतु आता खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जातीसाठी नाही मातीसाठी मतदान करा असं आवाहन मतदारांना केले आहे त्यामुळे पवार यांनी सुद्धा जातीचा उल्लेख केला आहे असे सुद्धा तावडे यांनी बोलून दाखविले होते. दरम्यान, राधाकृष्ण विखे यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता त्यांच्या प्रवेशाबाबत मला माहित नाही. त्यांनी आधीच सांगितलं होतं की मी राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही. त्यांच्या मुलाचा ते प्रचार करत असतील तर ते स्वाभाविक आहे असं विनोद तावडे यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5