Skip to content Skip to footer

काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांचे नागरितत्व काढून घेतले होते – नरेंद्र मोदी

काँग्रेस पक्षाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नागरितत्व काढून घेतले होते तसे मतदानाचा सुद्धा अधिकार काढून घेतला होता. असे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर लावला होता. नरेंद्र मोदी लातूर जिल्हयातील औसा येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारा दरम्यान ते बोलत होते. तसेच राहुल गांधी आणि काँग्रेस जाहीरनाम्यावर सुद्धा नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला होता. “काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पाकिस्तानचा सूर दिसून येत आहे. सैनिकांचे विशेष अधिकार काढून घेण्याची काँग्रेस पक्षाची ही भूमिका पाकिस्तान राष्ट्राला पूरक आहे. असे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखविले.

काँग्रेस देशविरोधी आहे हे सांगताना नरेंद्र मोदी यांनी शिवसेना प्रमुख दिगवन्त बाळासाहेब ठाकरे यांचा नावाचा उल्लेख केला होता. काँग्रेस पक्षाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नागरितत्व काढून घेतले होते तसे मतदानाचा सुद्धा अधिकार काढून घेतला होता असा आरोप काँग्रेस पक्षावर मोदी यांनी लगावला होता. वादग्रस्थ प्रचारामुळे १९९९ ला केंद्रीय आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा आणि निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार काढून घेतला होता. त्यानंतर बाळासाहेबांनी २००६ मध्ये आपला मतदानाचा अधिकार बजावला होता.

Leave a comment

0.0/5