दक्षिण मुंबईचे काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्या संकटात अजून वाढ होण्याचे चिन्ह दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी काँग्रेस माजी अध्यक्ष संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांच्यातील वाद मिटवण्यासाठी खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी लक्ष घातले होते. त्यावर देवरा यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मुंबई काँग्रेस पद देण्यात आले होते. आज जैन समाजाला आकर्षित करण्यासाठी चुकीची माहिती देऊन शिवसेना पक्षाला बदनाम करण्याचे काम मिलिंद देवरा त्यांनी केले आहे. मिलिंद देवरा अचार संहिता भंग केल्या विरुद्ध ऍड. धर्मेंद्र मिश्रा यांनी रीतसर तक्रार निवडणूक आयोगाकडे केलेली आहे.
२०१४ च्या निवडणुकीला मिलिंद देवरा यांना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी तगडे आव्हान निर्माण केले होते आणि देवरा यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आज खासदार अरविंद सावंत प्रतिनिधीत्व करत असलेल्या भागात विकासाच्या मुद्द्यावर अनके कामे करण्यात आलेली आहे. त्याचमुळे संसद भवनात जास्त प्रश्न विचारण्याचा मान खासदार सावंत यांना मिळालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला अपप्रचार करून त्याची प्रतिमा मालिन करण्याचे काम देवरा करत असताना दिसत आहे.