Skip to content Skip to footer

राज ठाकरेंच्या सभेला खर्च कोणाच्या नावावर टाकायचा निवडणूक आयोगाची पंचायत

लोकसभा निवडणुकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही असेच जाहीर केले आहे परंतु मोदी आणि भाजपा विरोधात भूमिका मांडणार असे सुद्धा राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. आज राज ठाकरे यांची जाहीर सभा नांदेड शहरात आयोजित करण्यात आलेली होती. परंतु या सभेमुळे निवडणूक आयोगाची चांगलीच पंचाईत झालेली दिसून येत आहे. आचारसंहिता लागल्यावर राजकीय सभांचा खर्च हा त्या पक्षाच्या उमेदवाराच्या नावावर टाकला जातो, पण महाराष्ट्रात मनसेचा एकही उमेदवार नाही. त्यामुळे नांदेडच्या सभेचा खर्च कुणाच्या नावावर टाकायचा असा प्रश्न निवडणूक आयोगाला पडला आहे. त्याचं उत्तरही निवडणूक आयोगाने शोधलं आहे. राज ठाकरे हे कुणाला मतदान करा हे भाषणात सांगतील, त्यानुसार खर्च लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. समजा कुणाला मतदान करायचे हे सांगितले नाही तर निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागवण्यात येणार आहे.

राज ठाकरे यांचे महाराष्ट्रात सहा ते सात सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच नांदेड मध्ये काँग्रेस पक्षा कडून अशोक चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे तर वंचित बहुजन आघाडी कडून यशराज भिंगे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. जर राज यांनी भाजपाला मतदान न करण्याचे आव्हान केलेले आहे तर मनसेच्या मतांचा फायदा कोणाला होणार यावर सध्या चर्चा रंगत असताना दिसत आहे. त्यामुळे राज ठाकरे आघाडीच्या उमेदवारांचे नाव घेतात का? यावरच सध्या निवडणूक आयोग लक्ष ठेऊन आहे. परंतु राज ठाकरे यांची सभा ही खासदार अशोक चव्हान यांच्यासाठीच असली तरी सभेला त्यांच्या बाजूने नाव घेतात का हे पाहावे लागेल.

Leave a comment

0.0/5