हातकणंगले मतदार संघातील शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा मतदारसंघात आयोजित करण्यात आली होती या सभेला खासदार राजू शेट्टी यांचे जुने निकटवर्तीय आणि मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्यावर टीका केलेली आहे. ” राजू शेट्टी म्हणजे उसाला लागलेला कोल्हा आहे आणि ह्या कोल्ह्याला हाकलून लावले पाहिजे हा कोल्हा कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून नव्हे, तर मांडीवर जाऊन बसला आहे, असा जोरदार हल्लाबोल खोत यांनी चढवला होता. या कोल्ह्याचा बंदोबस्त या निवडणुकीत आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. असे आव्हान मतदारांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना केले होते.
एकेकाळी राजू शेट्टी यांचे समर्थक म्हणून सदाभाऊ खोत यांच्याकडे पहिले जात होते. परंतु राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील कारखानदार नेत्यांबरोबर शेट्टी यांचे बसने-उठणे वाढल्यामुळे खोत यांना पटत नव्हते म्हणूनच खोत यांनी शेट्टी यांच्या पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पुढे खोत सभेला उद्देशून म्हणाले की, “हा गडी आधी म्हणायचा की, काका-पुतण्याचा खिसा फाटला तर महाराष्ट्र कर्जमुक्त होतील, परंतु हा गडी त्याच खिशात जाऊन बसला” असा टोला सुद्धा सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना लगावला होता. पुढे हातकणंगले मतदार संघातील उमेदवार धैर्यशील माने यां