Skip to content Skip to footer

रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचतंय खूळ – देवेंद्र फडणवीस

आज मसनेची अवस्था काय आहे सर्वांनाचा माहित आहे. मनसेची आजची अवस्था उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना अशीच झालेली आहे. राज ठाकरे लग्न दुसऱ्याचे असताना स्वतः नाचतात अशीच त्यांची अवस्था झालेली आहे. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेली आहे. नांदेड मध्ये शिवसेना-भाजपा उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्या सभेला ते बोलत होते. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, राज ठाकरे यांना निवडणूक लढवायची नाही म्हणून ते काहीही बोलत आहे. त्यांना कुणालाच काही पुरावा द्यायचा नाही. राज ठाकरे यांनी माझ्यावर बसवलेले मुख्यमंत्री म्हणून टीका केली होती. परंतु मला जनतेने या खुर्चीवर बसवलेले आहे.

राज ठाकरे यांच्या नांदेड मधील टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज ठाकरे गोदावरीच्या पाण्याबद्दल विचारात, मात्र हा करार आघाडी सरकारच्या काळात अशोक चव्हाणांनी केला होता, मी मुख्यमंत्री झाल्यावर तो रद्द केला असे सांगितले. पुढे राज ठाकरे यांच्यावर टीका करताना “राज ठाकरे यांची आजची अवस्था पाहता “अधे इधर आधे उधर बाकी मेरे पीछे आव” अशीच अवस्था झालेली आहे. अभ्यास न करता राज ठाकरे आरोप करत असतात. महाराष्ट्राचे पाणी गुजरातला दिले परंतु हा करार चव्हाणांनी केला होता. तो नारपारचा कायदा या पट्टयाने रद्द करून हक्काचे पाणी आणले अशी आठवण सुद्धा राज ठाकरे यांना करून दिलेली होती.

मनसे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती, नंतर महाराष्ट्रात मतदार नसलेली सेना झाली. आता तर उमेदवारचं नसलेली सेना बनली आहे, राज ठाकरेच काम म्हणजे “रताळ्याला म्हणतात केळं आणि दुसऱ्याच्या लग्नात नाचतंय खूळ” अशी टीका टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

Leave a comment

0.0/5