Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर एअर स्ट्राईक…….

शरद पवारांना वाऱ्याची दिशा लक्षात आली ते असं कधीच काही करत नाही. ज्यातून काहीतरी त्यांचे नुकसान होईल. वाऱ्याची दिशा बदलत असल्याचे लक्षात आल्यामुळेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली असेच असं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. माढा भाजपा उमेदवार रणजितसिह नाईक-निंबाळकर आणि बारामती भाजपा उमेदवार कांचनताई कुल यांच्या प्रचारार्थ सभेला नरेंद्र मोदी बोलत होते. माढा लोकसभा मतदारसंघाकडे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची लढाई म्हणून बघत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी आता भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेचे आयोजन केले आहे.

विजयसिह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे माढ्यातील दिग्गज नेते राहिले आहेत. पण काही दिवसांपूर्वीच त्यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आज अकलूजमध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपमध्ये प्रवेश करणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, नरेंद्र मोदींची आजची माढा मतदारसंघासाठी ही सभा होत असली तरी बारामती मतदारसंघासाठीही हीच सभा असल्याचं भाजपने स्पष्ट केलंय. मोदी यांची बारामती मतदारसंघातील सभा रद्द झाल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा १९ एप्रिलला बारामतीत सभा घेणार आहेत.

Leave a comment

0.0/5