राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धाराशिव येथून परतत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी आपल्या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला व सोलापूरच्या बालाजी हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या ‘टुरिंग टॉकिज’ची पुढची स्क्रिप्ट शरद पवार यांनी त्यांना दिली असावी असा गौप्यस्फोट शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत केला. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विनोद तावडे बोलता होते.
राज ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सभा घेण्याचा धडाकाच लावला आहे. काल सोलापूर येथे झालेल्या सभे नंतर आज राज ठाकरे यांची इचलकरंजी येथे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ सभेला राज ठाकरे बोलणार आहे. सोलापूरला शो झाला व काही शो राज्यात इतरत्र होणार असल्याचे सांगतानाच तावडे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खर्च भाजपने निवडणूक आयोगाकडे मागितला नव्हता, तर राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खात्यात दाखविणार एवढीच मागणी आपण निवडणूक आयोगाला केली होती.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल नांदेडमध्ये बोलताना राफेलचा पुन्हा मुद्दा उपस्थित केला. पण सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना जी चपराक लगावली आहे व नोटीस दिली आहे, त्याचे उत्तर त्यांनी अद्याप दिलेले नाही. यासंदर्भात जर राहूल गांधीनी खुलासा केला असता, त्यांचे म्हणणे जनतेला कळले असते असेही तावडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज ठाकरे आणि विंडो तावडे यांच्यात वाद वडणुची शक्यता वर्तवली जात आहे.