लोकसभा निवडणुकीला मुंबई-उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाने संजय निरुपम यांना उमेदवारी दिलेली आहे परंतु पक्षातीलच वरिष्ठांशी पटत नसल्यामुळे अनेक नेत्यांनी निरूपम यांच्या प्रचाराला पाठ फिरवली आहे. त्यातच उत्तर प्रदेश मध्ये बसपा- सपा युतीमुळे मुंबई-उत्तर जागेवर उत्तर प्रदेशातील सैदपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेल्या सुभाष पासी यांना समाजवादी पार्टीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या मतांचे विभाजन होणार आणि पाशा यांना पडणारी मते ही काँग्रेस पक्षाच्या वाटेची असणार असेच बोलले जाते.
उत्तर पश्चिम मतदारसंघात उत्तर भारतीय आणि मुस्लिम समाजाची मिळून एकूण सात लाख मते आहे. संजय निरुपम यांची मुख्य मदार या मतांवरच आहे. त्यामुळे यावेळी त्यांनी उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागून घेतली आहे. सुभाष पासी यांच्या उमेदवारीमुळे या एकगठ्ठा मतांचे विभाजन होण्याचा धोका आहे. उत्तर भारतीय मतदारांमध्ये बहुजन समाज पार्टीशी एकनिष्ठ असलेले मतदारही आहेत. ही मते सुद्धा सुभाष पासी यांच्याकडे वळू शकतात त्यामुळे निरुपम यांचे येणाऱ्या निवडणुकीला डीपोझीट सुद्धा जप्त होऊ शकते.
सध्या हा मतदार संघ शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. २०१४ च्या निवडणुकीला खासदार गजानन कीर्तिकर हे भारी बहुमतांनी जिंकून आले होते. या निवडणुकी नंतर मतदार संघातून निरुपम गायबच झाले होते. परंतु निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा ते हजार झाले आहेत असे विभागातील काँग्रेस कार्यकर्ते बोलून दाखवत आहे. म्हणूनच त्यांनी या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचे ठरवले होते परंतु पक्ष श्रेठींच्या आदेशाने त्यांना पालन करावे लागले. त्यामुळे कुठेतरी निरुपम यांना उमेदवारी देऊन पक्षाने त्यांना बळीचा बकरा बनवला आहे