Skip to content Skip to footer

महाडिकांनी आमची मैत्री पहिली आता दुश्मनी पाहू नये – चंद्रकांत पाटील

कोल्हापूरात महसूल मंत्री पाटील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांची मैत्री अख्या पश्चिम महाराष्ट्राला माहित आहे. परंतु शिवसेना आणि भाजपा महायुतीच्या घोषणे नंतर महाडिकांच्या विरोधात उभे राहिलेले महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना निवडून आणण्याचा निर्धारच पाटील यांनी केलेला आहे. महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना मैत्रीपोटी चंद्रकांत पाटील छुप्या पद्धतीने मदत करत आहे. किंबहुना तो पसरवला ही जात आहे. त्यामुळेच आक्रमक झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी हे उत्तर दिले आहे.

माझी मातोश्रीवर तक्रार जाऊ देऊ नका – चंद्रकांतदादा पाटील

केंद्रात आणि राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार असून आमची युती घट्ट झाल्याने, कोणी पंगा घेऊ नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मी ओबडधोबड दिसतो म्हणून मला काही समजत नाही असे समजू नका, जाड भिंगाच्या काचांमधून माझ्या डोळ्यात काय आणि डोक्यात काय चालले, याचा अंदाज कधीच कोणाला येणार नाही, असा घणाघात चंद्रकांत पाटलांनी केला आहे. कोल्हापुर जिल्यात पालकमंत्री हे महाआघाडीचे उमेदवार महाडिक यांना आतून मदत करत आहे अशी अफवा कोल्हापुरात पसरवली जात आहे त्यातून महायुतीच्या पक्षांत संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून चंद्रकातदादा पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिकांना तंबी दिलेली आहे.

Leave a comment

0.0/5