Skip to content Skip to footer

प्रकाश आंबेडकर यांच्या कढुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

२०१९ लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण निवडणूक आयोग सज्ज असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते तसेच सोलापूर आणि अकोला मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले प्रकाश आंबेडकर व त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी ईव्हीएम मशीन संदर्भात लगावलेले आरोप निवडणूक निर्णय आयोगाने फेटाळून लावले आहे. गुरुवारी मतदानाच्या दिवशी प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीसमोरील बटण दाबले तरी मतदान कमळालाच जाते असा गंभीर आरोप केला होता. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सोलापूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले असून लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आंबेडकर करत असल्याचे त्यांनी सांगितले

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले की, आंबेडकर पिता-पुत्रांचा आरोप चुकीचा आहे. मी याची खात्री केली असून असा कोणताही दोष ईव्हीएममध्ये दिसून आलेला नाही. विनाकारण ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचे पसरवले जात आहे. दिशाभूल करण्यासाठी हा आरोप केला जात आहे. उमेदवाराच्या तक्रारीनंतर एक पथक तपासणीसाठी गेले असता अशी कोणतीही बाब आढळून आली नाही, असेही ते म्हणाले. ग्रामीण भागासह शहरी भागात मिळून एकूण ३५ ठिकाणी असे प्रकार घडल्याचे सुजात यांनी म्हटले. सुजात पाठोपाठ प्रकाश आंबेडकर यांनीही मतदान यंत्रात घोळ असल्याचं म्हटलं आहे. मात्र, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

Leave a comment

0.0/5