लोकसभा निवडणुकीला पश्चिम महाराष्ट्रात दोन्ही पक्षासाठी प्रतिष्ठेची समजली जाणारी जागा म्हणजे बारामती, हा बारामती मतदार संघ म्हणजे पवारांचा बालेकिल्ला याच बालेकिल्ल्यात पवारांना चीत करण्यासाठी महायुतीने या मतदार संघातून कांचन राहुल कुल यांना राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीला उतरविले आहे. तसेच केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांची भली मोठी फौजच हा गड जिंकण्यासाठी भाजपाने मैदानात उतरवली आहे. हा गड जिंकण्यासाठी खुद्द भाजपा पक्षाने अध्यक्ष अमित शहा यांची बारामती मतदार संघात सभा आयोजित केली होती.
या सभेला बोलताना शहा म्हणाले की “बारामतीची लढाई मैत्रीपूर्ण आहे” अशा अफवा होत्या. बारामती जिंकण्यासाठी लढत आहोत आणि हा संदेश देण्यासाठीच बारामतीत मी आलो आहे. यंदाची लोकसभेची लढाही महत्वाची आहे. बारामतीच्या मुळावर घाव घातला पाहिजे. त्यासाठी मी बारामतीत आलो आहे. कांचन कुल यांना विजय करून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करा. असे आव्हान सुद्धा भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी बारामती मतदार संघात केले होते. शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर सुद्धा अमित शहा यांनी जोरदार हल्ला चढविला होता.
“देशात ५० वर्षे सातत्याने सत्तेत व केंद्रात १० वर्ष केंद्रीय कृषी मंत्री असलेल्या शरद पवारांनी बारामती, पुणे व राज्याचा काय विकास केला हे सांगावे. असा सवाल करत भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते पवारांशी भर चौकात चर्चा करायला तयार आहे. पवार कृषी मंत्री असताना कच्ची साखर आयात करत होते ती मोदींनी थांबविली. त्याचा ऊस उत्पादकांना चांगला फायदा झाला. त्यामुळे कारखानदारी बळकट झाली आम्ही न मागता ५ वर्षाचा हिशेब दिला. शरद पवार आपण काय केले याचा हिशेब द्यावा” असे आव्हान शहा यांनी पवारांना केले.