Skip to content Skip to footer

इचलकरंजी आणि गडहिंग्लज शहरात उद्धव ठाकरे यांची झंझावत सभा

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झंझावत सभांमुळे अक्खा पश्चिम महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. शनिवार शिवसेना-भाजप महायुतीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी इचलकरंजी श्रीमंत घोरपडे नाटय़गृह चौकात सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिली आहे. तर कोल्हापूरचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिली आहे.

या सभेला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर मंत्री चंद्रकातदादा पाटील, सदाभाऊ खोत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख विजय देवाने आणि शिवसेना भाजपा पक्षाचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही जागेवर शिवसेना पक्षाचे उमेदवार रिंगणात असून या दोन्ही जागा महायुतीकडे खेचून आणण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. या सभेला उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आपल्या शैलीत कसा समाचार घेतील हे आज होणाऱ्या सभेला दिसून येईल.

Leave a comment

0.0/5