Skip to content Skip to footer

डॉ. धवलसिंह मोहिते-पाटलांचा भाजपा पक्षाला पाठिंबा….

मोहिते-पाटील घराण्यातील रणजीत सिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपाचा झेंडा हातात घेतल्यानंतर त्यांच्या पासून दुरावलेले आणि राष्ट्रवादीच्या गोटात शिरलेले डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सुद्धा अखेर भाजपा उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे प्रथमच संपूर्ण मोहिते-पाटील परिवार हे भाजपा पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे. डॉ. धवलसिंह हे प्रकाशसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव आहे. परंतु काही वर्षांपासून हे कुटुंब विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात काम करत होते. प्रकाशसिंह मोहिते-पाटील यांनी माढा मतदार संघात कार्यकर्त्यांची एक मोठी फळी निर्माण केली आहे.

रणजीतसिंह मोहिते-पाटील हे भाजपा पक्षात गेल्या पासून डॉ. धवलसिंह यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबरच्या बैठकित वाढ झाली होती. पुढे राष्ट्रवादीचे शरद पवार सांगोला येथे आले असता पुन्हा डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांची शरद पवार यांच्या बरोबर दुसरी बैठक झाली होती. मात्र काल रात्री त्यांनी माढा मतदार संघाचे भाजपा उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्याशी झालेल्या बैठकी नंतर त्यांनी निंबाळकरांना पाठिंबा जाहीर केला. येन निवडणुकीच्या तोंडावर डॉ. धवलसिंह यांनी दिलेल्या पाठिंबामूळे राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ होणार असेच दिसते.

Leave a comment

0.0/5