वरळी येथे उद्या आदित्य सवांद

आदित्य ठाकरे| Worli-to-tomorrow-Aditya-

शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्थ असले तरी “आदित्य संवाद” च्या माध्यमातून तरुणांनाशी संपर्क साधत आहे. महाराष्ट्रातील तरुण पिढी काही सांगू पाहते. या तरुणाईच्या प्रश्नांना मनमोकळेपणे उत्तर देण्यासाठी तसेच त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवार, २२ एप्रिल रोजी मुंबईत वरळी येथे होणाऱ्या ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमात मुंबईतील तरुणांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे तरुणांना आपले प्रश्न मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे, असेच बोलले जात आहे.

देशातील सर्वात मोठी शक्ती असणाऱ्या युवकांच्या समस्या व विचारांसाठी ‘आदित्य संवाद’ या उपक्रमाच्या माध्यमातून चर्चासत्रात्मक व्यासपीठ तरुणांना उपलब्ध झाले आहे. संभाजीनगर, कोल्हापूर आणि नाशिक या प्रमुख शहरांत या उपक्रमाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘आदित्य संवाद’ उपक्रमातील पहिल्या टप्प्यातील चौथ्या सत्रात आदित्य ठाकरे १५ हजार युवकांशी थेट तर १५ लाख युवकांशी डिजिटल माध्यमातून संवाद साधणार आहेत. वरळी येथील एनएससीआय डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये सोमवार, २२ एप्रिल सायंकाळी ५ वाजता होणारा ‘आदित्य संवाद’ हा कार्यक्रम १८ ते ३० वयोगटातील मुंबईकरांसाठी खुला आहे. मुंबईमधील वाणिज्य, कला, विज्ञान, इंजिनीयरिंग, पॉलिटेक्निक, मेडिकल, सांस्कृतिक, क्रीडा आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांतील युवक–युवती यामध्ये सहभागी होणार आहेत.

‘आदित्य संवाद’ कार्यक्रमाच्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या व्हिजिटिंग कार्डचे वाटप करण्यात येणार असून त्या माध्यमातून युवक त्यांच्याशी नेहमी संवाद साधू शकतात. हा केवळ पहिला टप्पा असून संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांशी अशा प्रकारच्या भेटीद्वारे ते संवाद साधणार आहेत. जास्तीत जास्त तरुणांनी या उपक्रमात सहभागी होऊन आजच्या तरुणाईला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधावा, असे आवाहन युवासेनेने केले आहे. आज कुठेतरी तरुणांचा कल आज राजकीय क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसेच त्यांच्या समस्या ह्या सुद्धा या संवादाच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करताना दिसत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here