Skip to content Skip to footer

विश्वासघातकी पवारांच्या पालख्या किती काळ उचलणार, हर्षवर्धन पाटलांना मुख्यमंत्र्यांचा सवाल

शरद पवार यांनी १९९१ पासून विश्वासघाताचे राजकारण केले. स्वर्गीय शंकरराव पाटील यांनाही लोकसभेला कामाला लागा असे सांगून अचानक पुतण्याला उमेदवारी दिली होती. त्यामुळे तुम्ही कितीही काम करा. तुम्हाला ही मंडळी चित केल्याशिवाय राहणार नाही. किती पालख्या उचलायच्या ते तुम्ही ठरवा. तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. मात्र मित्र होता म्हणून सांगतो तुमचा वाली कोण आहे ते तुम्ही ठरवा असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना विचारला आहे.

इंदापूर येथे कांचन कुल यांच्या प्रचारा दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर टीका केली होती.
इंदापूर येथे महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ सांगता सभेत मुख्यमंत्री बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले की, पक्षाच्या प्रमुखाला हवेची दिशा समजली त्यामुळे माढा मतदारसंघातून पळ काढावा लागला. त्यामुळे यांचे तर काय होईल? पंतप्रधान मोदीनी बेटी बचाओ असा नारा दिला. मात्र याचे अनुकरण पवार बेटी बचाओ असे सांगून करत आहेत. घरात घुसून मारण्याची भाषा यांच्याकडून केली जात आहे ही अनुकरणीय नाही. ते म्हणाले, मुळशी धरणाचा पाण्याचा प्रश्न सोडवुन या भागातील बावीस गावाना पाणी दिले जाईल. डबघाईला आलेल्या कारखान्यांना मदत केली. मात्र भीमा पाटस साखर कारखान्याला केवळ राजकीय हेतूने पुणे जिल्हा बँकेने मदत केली नाही. त्यामुळे राज्यशासन कारखान्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे असे मत सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5