Skip to content Skip to footer

राहुल शेवाळे यांच्या विरोधात राज ठाकरे जरी उभे राहिले तरी निवडून येणार नाही – मनोहर जोशी

निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपा आणि मोदी यांच्या विरोधात सभा घेत आहे. आज मनसे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात न उतरता काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला फायदा होईल अशीच भूमिका आपल्या भाषणातून मांडत आहे. आता राज ठाकरे यांच्या या निर्णयाचा खुद्द शिवसेना पक्षाच्या जेष्ठ नेत्याने त्यांना सुनावले आहे. “भातावर माशी बसली, तर भात खराब होत नाही. राज ठाकरे यांना निवडणूक लढण्यास कुणी अडवले आहे? राज ठाकरेंनी स्वत: निवडणुकीत उभे राहावं. राज ठाकरे राहुल शेवाळेंच्या विरोधात जरी उभे राहिले तरी निवडून येणार नाहीत, असा टोला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी लगावला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र, राज ठाकरे यांनी राज्यात विविध ठिकाणी सभा घेण्याचा सपाटाच लावला आहे. राज यांनी पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्ला चढवत भाजपला मतदान करु नका, असे आवाहन करत आहे. शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या रॅलीत मनोहर जोशी सहभागी झाले होते. यावेळी राज ठाकरे यांच्या भूमिकेचा जोशी यांनी खरपूस समाचार घेतला. तसेच राहुल शेवाळे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वासही जोशी यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a comment

0.0/5