लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरलेले पवार घरण्याचे सुपुत्र पार्थ अजित पवार यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब मावळ मतदार संघात तळ ठोकून बसले आहे. त्यामुळे मावळ मतदार संघात पार्थ यांना विजय करण्यासाठी सर्व पवार परिवारच कामाला लागलेली दिसून येत आहे. मावळ येथील काणे फाटा येथे सामुदायिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला अजित पवार यांनी हजेरी लावत तेथील स्थानिक आमदार बाळा भेगडे यांच्याशी सात-आठ मिनिटे चर्चा केली. यावेळी युतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणेही शेजारीच होते. पण अजित पवार यांनी बारणेंशी बोलणं टाळले होते.
मावळ मतदार संघातलें निवडणूक जिंकणे राष्ट्रवादी पक्षाला प्रतिष्ठेची बनलेली आहे. तसेच या मतदार संघातूनच पार्थ पवार यांच्या राजकीय कारकीर्तीची सुरवात सुद्धा होणार आहे त्यामुळे हा गड राष्ट्रवादी पक्षाकडे खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादीने संपूर्ण ताकद पणाला लावलेली आहे. परंतु मावळ मतदार संघातील जनता हुशार आहे. आज आपल्या कारगिरीतून सलग पाच वेळा संसदरत्न मिळवणारे तसेच मावळच्या विकासाला गती देणाऱ्या श्रीरंग बारणे यांना जनता पुन्हा निवडून आणणार अशी परिस्थिती साध्य मावळ मतदार संघात निर्माण झालेली आहे. या मावळ मतदार संघात लोकशाहीचा विजय होऊन घराणेशाहीचा पराजय होईल असेच बोलले जाते.