Skip to content Skip to footer

कॉंग्रेस नेत्याचे आदिवासी बलात्कार पीडित मुलींबाबत बेताल वक्तव्य, आदिवासी समजात संतापाची लाट

कॉंग्रेस नेत्याने बलात्कार पीडित मुलींबाबत केलेल्या बेलगाम वक्तव्यामुळे सामाजिक स्तरातून तीव्र निषेध केला जात आहे. या बेलगाम वक्तव्यामुळे आदिवासी समाज विशेष नाराज झाला असून आदिवासी समाजाच्या महिलांनी संघटीत होऊन या नेत्यांचा निषेध केला आहे.काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी ‘पॉस्कोअंतर्गत सरकारकडून मिळणाऱ्या पैशांसाठी आदिवासी मुली बलात्कार झाल्याची तक्रार देण्यासाठी पुढे येतात’ असे बेलगाम वक्तव्य केले आहे. त्यामुळे आदिवासी समाजात संतापाची लाट पसरली आहे.

पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला तर सरकार कडून पैसे मिळतात. असे असल्याने आदिवासी मुली अत्याचार झाल्याची तक्रार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत, असे हीन दर्जाचे आणि संतापजनक वक्तव्य कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी आदिवासी समाजाच्या बलात्कार पीडित मुलींबाबत केले होते. याबाबत भाजपने या काँग्रेस नेत्यांवर एट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. आज ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षा पद एका महिलेने भूषविलेले आहे त्या नेत्यांना महिलान बद्दल बोलता विचार केला पाहिजे असे सुद्धा आज समाजातून बोलून दाखविले जात आहे.

या बेताल वक्तव्याबाबत दोन वाचाळवीरांनी आदिवासी समाजाची माफी मागितली. मात्र तरी देखील सुभाष धोटे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. तसेच समाज स्तरातून देखील या वक्तव्याची निंदा केली जात आहे. या वेळी संतप्त महिलांनी या काँग्रेस नेत्यांविरोधात नारेबाजी करत त्यांच्या फोटोला चपला मारून आणि थुंकून आपला राग व्यक्त केला. श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनी काँग्रेस नेत्यांचे हे वक्तव्य म्हणजे बलात्कार पीडित मुलींमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे येन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ह्या वक्तव्याचा काँग्रेस पक्षाला फटका बसणारच हे नाकारता येणार नाही.

Leave a comment

0.0/5