Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकापा कार्यकर्त्याचा शिवसेना पक्षात प्रवेश…

मावळ लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार संसदरत्न श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची झंझावात सभा उरण येथे पार पडली. या सभेला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकापचे माजी पूर्व विभाग चिटणीस आणि जिल्हा कमिटी सदस्य मनोज पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांनी भगवा झेंडा देऊन त्यांचे स्वागत केले. मनोज पाटील यांनी शिक्षक आणि तालुक्यातील विविध आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे येन निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेले असताना शेकापच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून विरोधकांना घाम फोडला आहे.

मावळ मतदार संघात श्रीरंग बारणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी कडून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. परंतु ते आपल्या पहिल्या भाषणा पासूनच तसेच आपल्या वागणुकीमुळे मावळ मतदार प्रसिद्ध झालेले दिसून येत आहे. त्यामुळे अश्या नवख्या उमेदवाराला निवडून देऊन मावळचा विकास हा भकास कधीच तेथील जनता होऊ देणार नाही. त्यातच शेकापच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून शिवसेना अधिक मावळ मतदार संघात मजबूत करण्याचे काम केले आहे असेच समजते. जे.के. म्हात्रे, एन.जी. पाटील, प्रवीण पाटील, किरण भारत पाटील, धनाजी म.पाटील, अमृत ठाकूर, विवेक घरत, शिवं पाटील, आदित्य गावंड, स्वराज तोटे, संदिप राम, अक्षय उंडालकर, आयुष रोकडे, अविनाश प्रसाद, पिंटू नोडी, समीर तोटे, शुभम गिरी, अन्सारी रझ्झाक, कार्तिकी बोबाले, अजय वर्मा, शिवं सोनी, संदिप धेरे, रोहित साळुंखे, ऋषी पाटील, अमरजित राम, राहुल पाटील, प्रसाद तुंबडे, अरविंद पाटील, महेश पाटील आदी कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला.

Leave a comment

0.0/5