Skip to content Skip to footer

आमचं ठरलय” शिवाजीराव चौकार मारणार – देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्याचे मतदान महाराष्ट्रात पार पडले. या तिसऱ्या टप्यात बारामती, माढा, कोल्हापूर आणि सातारा या मतदारसंघाचे भविष्य मतदान पेटीत बंद झाले आहे. काल शिवसेना खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरूर मतदार संघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. या सभेला बोलताना मुख्यमंत्र्यांनी आमचं ठरलय शिवाजीराव चौकार मारणार असा विश्वास सुद्धा बोलून दाखविला होता. पुढे पवारांवर टीका करतांना पहिल्यांदा पवार साहेब मैदानात उतरले. पॅड घातले, हॅन्डग्लोज घातले, हातात बॅट घेतली आणि बॉल टाकताना मोदींना पहिले आणि मैदान सोडून परत निघून गेले अशी टीका पवारांवर मुख्यमंत्र्यांनी केली होती.

पुढे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले की, एकीकडे पाडद्यावरचा कलाकार आहे तर दुसरीकडे जनतेचा कलाकार आहे आणि जनतेच्या कलाकाराला जनतेची कामे करावी लागतात. आमच्या या कलाकाराला चौथ्यांदा विक्रमी मतानें लोकसभेवर पाठवा असे बोलून पाटील यांच्या कामाची स्तुती मुख्यमंत्र्यानी केली. आज तीन वेळा खासदार राहिलेल्या शिवाजीराव अढळराव पाटील यांचे देशातील टॉप पाच खासदार व्यक्तींन मध्ये संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणारे खासदार म्हणून पाटील यांचे नाव घेतले जाते असे बोलून त्यांच्या कामाचा गौरव सुद्धा केला.

आज शिरूर मतदार संघातील जनतेचे प्रश्न इतक्या प्रखरपणे लोकसभेत त्यांनी मांडलेले आहे. परंतु आज विरोधकांकडे विकासावर बोलण्यासाठी कोणताही मुद्दा राहिलेला नाही म्हणूनच शिवाजीराव अढळराव यांच्यामुळेच एअरपोर्ट गेले असा खोटा आरोप लावण्यात आलेला आहे. परंतु ज्या वेळी एरपोर्ट्च्या संदर्भात सर्वे करण्यात आला तेव्हा इथल्या भौगिलिक परीस्थितीमुळे हा प्रकल्प हलव्यात आलेला होता असे विमान प्राधिकरण यांच्याकडून कळविण्यात सुद्धा आले होते. असे बोलून शिवाजीराव पाटील यांच्यावर लावलेले आरोप खोडून काढले आणि महायुतीचे उमेदवार खासदार पाटील यांना पुन्हा विजय करून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आव्हान शिरूर मधील जनतेला मुख्यमंत्र्यानी केले आहे.

Leave a comment

0.0/5