सध्या भाजपच्या विरोधात लाट आहे, पण इव्हीएम हॅक करून मतदान प्रक्रियेवर परिणाम केला जाऊ शकतो” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मतदान संपायला आलं तेव्हा केला आहे. दरम्यान, या आरोपांमध्ये तथ्य नाही आणि पवारांनी पराभवाची कारणं लिहायला सुरुवात केलीय, असं हल्ला भाजपने केला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “ज्यावेळेस पराभव दिसतो, त्यावेळेला इव्हीएम हे एकच कारण विरोधकांना मिळतं. ज्या इव्हीएमवर ते पंजाबमध्ये सरकारमध्ये येतात, कर्नाटकात सत्तेत येतात, तिथं मात्र यांना इव्हीएम मध्ये प्रॉब्लेम दिसत नाहीत. भाजपाच्या जागा आल्या की यांना इव्हीएम मध्ये प्रॉब्लेम दिसायला लागतो. नाचता येईना, अंगण वाकडे असंच हे धोरण आहे.”
शरद पवारांचे मुंबई मतदार संघात नाव असल्यामुळे त्यांना काल झालेल्या बारामती मतदार संघाच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाने बारामतीत थांबण्यास मज्जाव केला. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईकडे रवाना व्हावे लागले. तसेच इव्हीएम विरोधात घेतलेल्या मुंबईतील पत्रकार परिषदेत चंद्रबाबूं नायडू यांच्या बरोबर पवारांनी सुद्धा पत्रकार परिषेदेला हजेरी लावली होती. या पत्रकार परिषेदेत राष्ट्रवादीचे नवाब मलिक, आमदार आव्हाड तसेच काँग्रेसचे नेते सुद्धा उपस्थित होते. शरद पवारांनी लावलेल्या आरोपाचे खंडन करताना पवारांना आपला पराभव दिसू लागल्यामुळे ते त्याचे बिल इव्हीएम मशीनवर फोडत आहे असा आरोप चंद्रकातदादा पाटील यांनी लगावला होता.