Skip to content Skip to footer

काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे कोंबडी विकण्याचा धंदा – देवेंद्र फडणवीस

काँग्रेस गरिबी हटवू शकत नाही, उधारीचा वायदा आहे. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे कोंबडी विकण्याचा धंदा असून सर्व आश्वासने खोटी आहेत. ५५ वर्षांत काँग्रेसने अनाचार, भ्रष्टाचार, दुराचार यांची मालिका सुरू ठेवली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. उत्तर-पश्चिम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ अंधेरी पूर्वेकडील सुभाषनगर येथे झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते. दरम्यान, गजानन कीर्तिकरांसारखे नेतृत्व हवे असे सांगतानाच संसदेत प्रश्न विचारणाऱ्या देशातील पाच खासदारांमध्ये कीर्तिकरांचा समावेश असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्याच्या प्रचाराला सर्वच राजकीय पक्षात जोरदार सुरवात झालेली आहे. या मतदार संघात खासदार गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात काँग्रेसने संजय निरुपम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. परंतु पक्षा विरोधात भूमिका मांडून आणि आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात बोलून निरुपम यांच्या प्रचाराला काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे. यावेळी राज्यमंत्री रवींद्र वायकर, विद्या ठाकूर, विभागप्रमुख–आमदार ऍड. अनिल परब, अमित साटम, विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू, आमदार रमेश लटके, भारती लव्हेकर, रिपाइंचे प्रकाश जाधव उपस्थित होते.

पुढे राज ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, पूर्वी सायकल, मोटर भाडय़ाने घेतली जात होती, आता राष्ट्रवादी काँग्रेसने इंजिन भाडय़ाने घेतले आहे पण केवळ खोटे बोलून तोंडाच्या वाफेने इंजिन चालत नसते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला. काळाचौकी येथे शहीद भगतसिंग मैदानावर महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी आज विजयी संकल्प सभा झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

Leave a comment

0.0/5