Skip to content Skip to footer

२३ मे ला खासदार अढळराव पाटील विरोधकांचे डिपॉजिट जप्त करून निवडून येणार – उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि अंतिम टप्याच्या प्रचाराला जोरदार सुरवात झालेली आहे. आज शिरूर मतदार संघाचे खासदार शिवाजी अढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शिरूर मतदार संघात आले होते. आपल्या सभेची सुरवात करताना खासदार पाटील यांनी मागील १५ वर्षांपासून केलेल्या कामाची प्रशंसा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली शिवाजीराव यांनी चौकार षटकार मारलाच पाहिजे कारण सध्या IPL चालू आहे. अढळराव समोरील जमलेली जनता तुम्हाला अभिमानाने नाही सन्मानाने दिल्लीत पाठवणार आहे. पूढे बैलगाडा शर्यतीवर बोलतांना बैलगाडा शर्यत हा प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे असे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविले होते.

पूढे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव न घेता टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, खासदार हा तुमच्या सोबत राहून काम करणारा पाहिजे की नाटकात काम करणारा खासदार पाहिजे. आमच्या खासदारांनी केलेली कामांचे कट-पेस्ट विरोधक करत आहेत. आमचे पंतप्रधानांपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे ठरलेले आहे परंतु विरोधकांकडे एक नाव तरी आहे का? असा सवाल विरोधकांना विचारला. पूढे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवा काशीत यांच्यात घडलेल्या प्रसंगाचा किस्सा बोलून दाखविला. मन ओतून जीव लावून काम करणारा कलाकार हा कधीही भगवा खाली उतरवत नाही आणि दिल्लीत दुसऱ्याला पाठवा असा बोलणारा असू शकत नाही असा प्रश्नच उपस्थित केला होता.

शिवाजी महाराज यांचे काम करणारा म्हणून नाही तर शरद पवारांचा उमेदवार म्हणून ये मत मागायला, मग आम्ही पाहून घेऊ असे बोलून आपल्या अभिनयाचा फायदा कोल्हे मत मागायला घेत असल्याचे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी नमुद केले आहे. पूढे काँग्रेच्या जाहीरनाम्यातील ३७० कलमाची माहिती सुद्धा उपस्थित जनतेला करून दिली. शिवाजीराव चौकार मारणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आणि गिरीश बापट तुम्ही पुण्याचे पालकमंत्री आहात पण मी शिवसेनेच्या २३ खासदारांचा पालक आहे. मावळा म्हटलं की संकटाला डगमगत नाही. शिवाजीराव या जनतेचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. शिवाजीरावांचा विजय हा समोरच्याचे डिपॉझिट जप्त करणारा दणदणीत विजय मला हवा आहे. असे उदगार सुद्धा उद्धव ठाकरे यांनी खासदार पाटील यांच्यासाठी शिरूर मतदार काढले होते.

Leave a comment

0.0/5