Skip to content Skip to footer

राज ठाकरे आणि शरद पवार यांची स्क्रिप्ट सेम टू सेम – विनोद तावडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे जरी वेग-वेगळ्या सभेत बोलत असले तरी त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द सारखेच आहेत त्यामुळे राज ठाकरे कोणत्या स्क्रिप्ट नुसार भाषण करत आहे हे आता महाराष्ट्राला वेगळे सांगायची गरज नाही असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ठ केले आहे. शरद व पवार व राज ठाकरे यांच्या वेगवेगळ्या जाहीर सभा झाल्या. पण या जाहीर सभांमधील भाषा मात्र एकच आहे. मोदी सरकार, भाजपाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली आहे हे शरद पवार पण बोलले आणि राज ठाकरे पण नेमके तेच बोलले. तसेच नरेंद्र मोदी हे शहीदांच्या नावावर मतं मागतात हेच वाक्य शरद पवारही बोलले आणि राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात हाच उल्लेख केला. त्यामुळे जनतेलाही आता कळले असेल की, राज ठाकरे कोणाच्या स्क्रीप्टनुसार कसे काम करीत आहेत असेही तावडे यांनी बोलून दाखविले.

राज ठाकरे यांनी आपल्या भांडूपमधील सभेत रेल्वे अपघातामधील मोनिका मोरे यांना व्यासपिठावर आणले होते. याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, ज्यावेळी त्यांचा अपघात झाला त्यावेळी त्या शिकत होत्या, त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी संजय निरुपम यांच्‍या सोबत केईएम रुग्णालयात मोनिका मोरे यांना भेटायला गेल्या. पण त्यावेळी काँग्रेस सरकारने काहीही केले नाही. पण खासदार किरीट सोमय्या यांनी आर्टीफीशिल ऑरगनच्या माध्यमातून मोनिका मोरे यांना सर्व प्रकारची मदत विविध ट्रस्टमार्फत करुन दिली होती. त्यामुळे मनसेचा हा खोटारडेपणा पुन्हा समोर आलेला आहे.

Leave a comment

0.0/5