मावळ लोकसभा मतदारसंघाचे पहिले शिवसेना खासदार गजानन बाबर पुन्हा स्वगृही परतले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भगवा ध्वज आणि उपरणे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. २०१४ मध्ये तिकीट नाकारल्यानंतर बाबर यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर बाबर यांनी आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची ताकत मावळ मतदार संघात वाढलेली दिऊन येत आहे.
मावळ येथे शिवसेना उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी झालेल्या सभा दरम्यान बाबर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. बाबर यांच्या प्रवेशामुळे बारणे हे अधिक मताने जिंकून येऊन विरोधकांचे डिपॉझिट जप्त करतील अशी चर्चा सध्या मावळ मतदार संघात रंगताना दिसून येत आहे.