Skip to content Skip to footer

काम नसल्याने रात्रभर यूट्यूब पाहतात आणि ‘लाव रे व्हिडिओ’ म्हणतात – देवेंद्र फडणवीस

सध्या काही काम नसल्याने ते रात्रभर यूट्यूब व्हिडिओ पाहत बसतात मग लाव रे व्हिडिओ, लाव रे व्हिडिओ करत बसतात. पण यांचे व्हिडिओ पाहून जनतेने यांना विधानसभेतूनच नव्हे तर महानगर पालिकेतून घरी बसवलं. अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सध्या वक्ते राहिलेले नाहीत म्हणूनच हे दोन्ही पक्ष वक्ते भाडयाने बोलावत आहे. पूर्वी जशी आपण सायकल भाडयाने घ्यायचो. तसं आता इंजिन भाड्याने भेटत आहे. मात्र तोंडाच्या वाफेवर इंजिन चालत नाही अशी टीका सुद्धा राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्यानी केली होती.

पुढे राष्ट्रवादीवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रवादीचे साहेब पिचवर न उतरता परत पॅव्हेलियनवर परतले, त्यामुळे राष्ट्र्वादीने निवडणूक सोडून दिल्याचा टोला सुद्धा मुख्यमंत्रीनीं पवारांना मारला होता. डोंबिवली येथे झालेल्या महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री डोंबिवली येथे आले होते. या सभेला पालक मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री चव्हान तसेच भाजपा आणि शिवसेना पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या सभे नंतर मुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीतील प्रसिद्ध गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

Leave a comment

0.0/5