लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर आहे. विजयासाठी सर्वच जण जिवाचे रानं करत आहेत. यातच भर म्हणून की काय? आता मराठी अभिनेते सुबोध भावेही राजकीय मैदानात उतरले आहेत. ते शिरुर मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी मंचर येथे सभा घेणार आहेत. सुबोध भावे हे एक उत्तम कलाकार असून शिवसेना चित्रपट सेनेचे सदस्य सुद्धा आहे. त्यामुळे पक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते मंचर येथे हजेरी लावणार आहे.]
शिरूर मतदार संघातील निवडणुकीवर सध्या साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. राष्ट्रवादी पक्षाने तेथील स्थानिक उमेदवार विलास लांडे यांच्यावर अन्याय करून शिवसेनेतुन बंडखोरी करून राष्ट्रवादी पक्षात गेलेल्या अमोल कोल्हे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. परंतु येन प्रचाराच्या दरम्यान शुटिंग मध्ये व्यस्त असलेले अमोल कोल्हे पुढे कसे काय जनतेचे प्रश्न सोडवू शकतात हा प्रश्न मतदारांना पडलेला आहे. तर दुसरीकडे जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आपल्या कामाच्या जोरावर सलग ३ वेळा खासदार म्हणून शिरूर मतदार संघातून निवडून आलेले आहे.
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे डॉ. कोल्हेंचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. तर सलग १५ वर्षे खासदार असलेल्या आढळराव पाटील यांचा राजकारणातील अनुभव दांडगा आहे. त्यामुळे शिरुरची लढत रंगतदार होणार आहे. परंतु शिरूर जनतेला नाटकात काम करणारा अभिनेता नको तर त्यांच्या सोबत राहून जनतेचे प्रश्न सोडविणारा नेता पाहिजे हीच आज शिरूर मतदार संघातील जनतेची मागणी आहे. त्यामुळे यंदा खासदार पाटील चौकार मारणार हीच स्थिती शिरूर मतदार संघात दिसून येत आहे.