जैन समाज महायुतीच्याच पाठीशी पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी मुंबईतले जैन बांधव वचनबद्ध आहेत. आमच्या समाजाचा पूर्ण पाठिंबा शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीला आहे, असे आश्वासन जैन समाजाच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेऊन दिले. दक्षिण मुंबईचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांनाच विजयी करण्यासाठी काम करू, असेही वचन जैन प्रतिनिधी मंडळातील वरिष्ठांनी यावेळी जैन समाजाचे प्रमुख, प्रतिष्ठत व अग्रगण्य संस्थांचे पदाधिकारी हितेशभाई मेहता, परेश भाई नंदप्रभा आदी मान्यवर उपस्थित होते.
काही दिवसापूर्वी देवरा यांनी केलेल्या जैन समाज विरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात सेनेच्या वतीने अॅड. धर्मेंद्र मिश्रा आणि सनी जैन यांनी ८ एप्रिल रोजी देवरांविरोधात आयोगाकडे तक्रार केली होती. त्यासोबत देवरा यांच्या भाषणाची सीडीही पाठवण्यात आली होती. या भाषणाच्या क्लिपनुसार देवरांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे दिसून येत असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची कारवाई करण्यात यावी, असे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले होते. आपल्या राजकीय फायदयासाठी जैन समाजाचा सुद्धा देवरा यांनी वापर केला होता. त्याचमुळे देवरा यांनी जैन समाजाची मने कुठेतरी दुखावलेली दिसून येत होती.