लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील चौथ्या आणि शेवट्याच्या टप्यातील मतदान अगदी उत्साहात पार पडले. मुंबईत अनेक कलाकार आणि सिने सृष्टीतील अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. परंतु, काही स्टार्सना मतदान करता आले नाही. त्यामध्ये आलिया भट्ट आणि अक्षय कुमारचाही समावेश आहे. अक्षयला आता तो भारताचा नागरिक नसल्याच्या मुद्द्यावरून ट्रोल केले जाऊ लागले आहे. अक्षय कुमार यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी आपल्या मुलाखतीत समोर आणले होते.
परंतु आज अक्षय कुमार यांना ट्रॉल करणाऱ्या व्यक्तींना त्यांनी देशातील जवांनाना आणि शेतकऱ्यांना केलेल्या मदतीचा कुठेतरी विसर पडलेला दिसून येत आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमामध्ये त्यानं शहिदांच्या कुटुंबीयांना नुकतीच १३ कोटींची मदत केली. अक्षय ‘भारत के वीर’ हे देशभक्तीपर गीत लॉन्च करण्यासाठी गेला होता तेव्हा त्याने शहीद जवानांच्या परिजनांसाठी तब्बल १२.९३ कोटी रूपयांची मदत केली. तसेच आसाममध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये जवान नरपत सिंह हे शहीद झाले. त्यानंतर अक्षयनं त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून त्यांना ९ लाखांची मदत केली.
छत्तीसगडच्या सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या १२ जवानांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारने १ कोटी ८ लाख रुपये मदत केली आहे.या हल्ल्यात सीआरपीएफचे १२ जवान शहीद झाले होते. मुंबईतील नायगाव येथे त्याने पोलीस आणि त्यांच्या कुटुंबासाठी अत्याधुनिक सुविधा असलेलं रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. पोलिस आणि त्यांच्या कुटुंबांना उपचाराच्या काळात राहण्यासाठी चांगली सुविधा मिळेल. पोलिस देशासाठी मोठं योगदान देतात. अक्षयकुमारने चेन्नई पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला . पूरग्रस्तांसाठी अक्षयकुमारने एक कोटी रुपयांची मदत दिली आहे. एका ट्रस्टतर्फे चेन्नईतील पूरग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते. ट्रस्टचे प्रमुख, निर्माते जयेंद्र यांच्याकडे अक्षयने मदतीचा चेक सुपूर्द केला. आज अक्षय कुमार यांनी केली कामे भरपूर आहे म्हणूनच त्यांना नावे ठेवणाऱ्यांनी या सर्व गोष्टीचा विचार करूनच अक्षय कुमार यांच्याकडे बोट करावे.