Skip to content Skip to footer

गडचिरोलीत नक्षल्यांकडून रक्तपात, भूसुरुंग स्फोटात १६ जवान शहीद

आज सर्वत्र उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोलीत नक्सलवाद्यांन कडूनपुन्हा एकदा हल्ला घडवण्यात आला आहे . गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात १६ जवान शहीद झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरखेडा गावामध्ये नक्षलवाद्यांनी ईम्प्रोवाईज्ड एक्सोप्लोझिव्ह डिव्हाईसच्या (आयईडी) सहाय्याने स्फोट घडवून आणला. राज्य सरकारने या घटनेला दुजोरा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद जवानांच्या घटनेला दुजोरा देत पोलिस महासंचालक आणि गडचिरोली पोलिस अधीक्षकांच्या संपर्कात असल्याची प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

गडचिरोली रेंजचे डीआयजी अंकुश शिंदे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले, की हल्ल्यात बळी ठरलेली क्विक रिस्पॉन्स टीम (क्युआरटी) कुरखेडा पोलिस स्टेशनची होती. जवळपास १६ जवानांची ती टीम पुरादा गावाकडे खासगी वाहनातून चालली होती. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी त्या जवानांच्या खासगी वाहनाला लक्ष्य करून स्फोट घडवला. क्युआरटी पथक नक्षलींना चकवा देण्यासाठी नेहमीच खासगी वाहनांचा वापर करत होते का? असे विचारले असता त्यांनी याबाबत माहिती घेत असल्याचे सांगितले. कुरखेडामध्ये सातत्याने नक्षली हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत तब्बल ३६ वाहने जाळल्याची घटना घडली होती. कुरखेडा तालुक्यामध्येच दादापूर येथे ही घटना घडली होती.

Leave a comment

0.0/5