Skip to content Skip to footer

सौ. कामिनी शेवाळे यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा

माजी नगरसेविका सौ. कामिनी राहुल शेवाळे यांना मंगळवारी सत्र न्यायालयाने दिलासा दिला. २०१४ साली मानखुर्द येथे झालेल्या मारहाणप्रकरणी लावण्यात आलेल्या गंभीर आरोपातून कामिनी शेवाळे यांच्यासह १८ जणांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. माननीय सत्र न्यायालयाने जमावबंदी संदर्भातील कायम ठेवलेल्या आरोपविरोधात माननीय उच्च न्यायालयात लवकरच अपील करणार असल्याची माहिती शेवाळे यांचे वकील एस के अली यांनी दिली.

मानखुर्द येथे पाच वर्षांपूर्वी दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. या वादात एक पोलीस हवालदार गंभीररीत्या जखमी झाले होते. याप्रकरणी माजी नगरसेविका कामिनी शेवाळे यांच्यासह १८ जणांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. मंगळवारी सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, कलम ३०७, ३३२ या गंभीर कलमांसाह  १४३, १४७, ११४,१५३, १७१-सी या दंगली संदर्भातील गंभीर कलमांतूनही सौ. शेवाळे आणि अन्य १८ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

गंभीर आरोपांतून सत्र न्यायालयाने दिलासा दिला असला तरीही कलम 149, 427 ही जमावबंदी आणि मालमत्तेचे नुकसान या संदर्भातली दोन कलमे कायम ठेवण्यात आली आहेत. याविरोधात माननीय उच्च न्यायालयात अपील करणार असल्याची माहिती सौ. शेवाळे यांच्या वकिलाने दिली आहे. या संदर्भात कामिनी शेवाळे याचे वकील एस के अली यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी झालेल्या घटनेतील गंभीर आरोपांतून मुक्तता केल्याबद्दल आम्ही माननीय सत्र न्यायालयाचे आभार मानतो. सत्र न्यायालयाने 149, 427 ही कलमे कायम ठेवली असली तरीही आमचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. या आरोपांविरोधात माननीय उच्च न्यायालयात लवकरच दाद मागणार आहोत. माननीय उच्च नाययालयातून आम्हाला कायमचा दिलासा मिळेल आणि सत्याचा विजय होईल.

Leave a comment

0.0/5