Skip to content Skip to footer

लोकसभा निवडणुकीच्या निकाला आधी सुजय विखे झाले खासदार…

लोकसभा निवडणुकीला काँग्रेस पक्षाला राम-राम ठोकून भाजपा पक्षा तर्फे निवडणुक लढवणारे डॉ. सुजय विखे-पाटील यांना जनतेने निकाला पूर्वीच खासदार म्हणून जाहीर केले आहे. तसेच संपूर्ण नगर जिल्ह्यात त्यांची चर्चा रंगताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा त्यांचे नाव प्रकाश झोतात आलेले दिसून येत आहे. नगर मधील एका लग्न पत्रिकेत त्यांच्या नावापुढे खासदार असा उल्लेख करण्यात आलेला आहे. नेवासा तालुक्यातील एका लग्नपत्रिकेत सुजय विखे याचं नाव छापण्यात आले आहे आणि त्यापुढे ‘संसद सदस्य भारत सरकार डॉ. सुजय विखे’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या लग्नाची पत्रिका सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. सुजय विखे यांची लढत ही राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांच्याशी होत आहे.

या जागेवर तसे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या जागेवरूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी काँग्रेस विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील जुने वाद पेटलेले दिसून येत होते. खरतर ही जागा राष्ट्रवादीच्या वाटेला गेल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीने ही जागा विखे यांना सोडण्यासाठी तयारी दर्शवली नव्हती त्या उलट आमदार जगताप यांना सुजय विखे यांच्या विरोधात पवारांनी उतरून याचे सुद्धा राजकारण केले होते. येणाऱ्या २३ मेला अंतिम चित्र स्पष्ठ होऊन सुजय विखे यांचा विजय होणार असेच नगर जिल्यात बोलले जात आहे.

Leave a comment

0.0/5