Skip to content Skip to footer

शिवसेना पुन्हा धावली दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला……

राज्यात भीषण दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. सर्वाधिक दुष्काळाच्या झळा मराठवाड्याला सोसाव्या लागत आहेत. शेतकऱ्यांची होरपळ सुरू आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते दुष्काळ दौऱ्यावर आहेत.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते, खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी गंगापूर, वैजापूर, कन्नड तालुक्यातील अनेक गावात भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी लोणी खुर्द, खंडाळा, लोणी आदी ठिकाणी शेततळे, रोहयो कामाची पाहणी, चारा छावण्या, नदी खोलीकरण, जलयुक्त शिवार अभियानास भेट देऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, तालुकाप्रमुख रमेश बोरणारे आदींसह शासकीय अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे चारा छावणीचे उद्घाटन केले. यावेळी शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, जिल्हा परिषग अध्यक्ष अॅड. देवयाणी डोणगावकर, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, तालुका प्रमुख प्रा. रमेश बोरनारे सर्कल प्रमुख नंदकुमार जाधव यांच्यासह शिवसैनिक, शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a comment

0.0/5