Skip to content Skip to footer

बळजबरीने पंजा समोरील बटण दाबायला लावले….

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असताना उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर बळजबरीने ‘पंजा’ला मतदान करायला लावल्याची तक्रार करण्यात आली आहे. एका वृद्ध महिला मतदाराने हा गंभीर आरोप केला आहे. आपल्याला कमळापुढील बटण दाबायचे असतानाही मतदान केंद्रावरील पीठासीन अधिकाऱयाने बळजबरीने काँग्रेसच्या पंजा या निशाणीपुढील बटण दाबण्यास सांगितले, असा थेट आरोप या महिलेने केला आहे.

हा प्रकार उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातील गौरीगंजच्या गुजरटोला मतदान केंद्र क्रमांक 316 वर घडला. घडलेल्या प्रकाराबाबत महिला म्हणाली, ’हाथ पकडकर जबरदस्ती पंजा पर धर दिहिन, हम देहे जात रहिन कमल पर’ (हात पकडून बळजबरीने पंजावर पकडला, मला तर कमळाला मत द्यायचे होते). मात्र याप्रकरणी कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नसून, या घटनेची माहिती सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे असे उपविभागीय महानगरदंडाधिकाऱयांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5