Skip to content Skip to footer

पद्मभूषण डॉ. विखे पाटील यांचा 9 मे रोजी लोणीत जयंतीदिन सोहळा….

शेती, सहकार, पाणी शिक्षण आणि ग्रामीण विकासाच्या संकल्पनेचे मार्गदर्शक माजी केंद्रीय मंत्री लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या 87 व्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन सोहळा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहीती पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

प्रवरा परिवार आणि लोणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने पद्मभूषण डॉ. विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. डॉ. विखे पाटील यांचे वारकरी सांप्रदायाशी एक वेगळे नाते होते. या क्षेत्रात मोठे योगदान त्यांनी दिले. आध्यात्मिक आणि वारकरी सांप्रदयातील त्यांच्या कार्याला जयंती दिनाच्या निमिताने उजाळा मिळावा म्हणून स्थानिक नागरिकांच्या वतीने सात दिवस अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन सप्ताहाच्या निमिताने करण्यात येत असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.

यावर्षी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून,पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांना अभिवादनाचा मुख्य सोहळा गुरूवार दि.9 मे 2019 रोजी सकाळी 10 वाजता लोणी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात संपन्न होणार असून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील भूषविणार आहेत. जिल्ह्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित राहाणार असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

पद्मभूषण डॉ. विखे पाटील यांच्या जयंती दिन सोहळ्याची जय्यत तयारी प्रवरा परिवाराच्या करण्यात आली असून या अभिवादन सोहळ्यास जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रवरा परिवाराच्या वतीने डॉ. विखे यांनी केले आहे.

Leave a comment

0.0/5