Skip to content Skip to footer

भाजपा हा पक्ष मोदी व शाह यांचा नाही, भविष्यातही नसेल – गडकरी

भारतीय जनता पार्टी हा पक्ष कोणत्याही एका व्यक्तीचा नाही. तो विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

भाजप हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा पक्ष आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याविषयी बोलताना गडकरी यांनी ‘भाजप सारखा राष्ट्रीय पक्ष कधीच व्यक्ती केंद्रीत होऊ शकत नाही. भाजपने आतापर्यंत घराणेशाहीला स्थान दिलेले नाही आणि यापुढेही भाजपत घराणेशाहीला स्थान मिळणार नाही त्यामुळे भाजप हा पक्ष कधीच अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेद्र मोदी किंवा अमित शाह यांचा नव्हता आणि यापुढेही नसेल’ असं मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही असा अंदाज तज्ज्ञ व्यक्ती व्यक्त करत आहेत. मात्र हा अंदाज खोटा आहे, गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा भाजपला जास्त मत मिळतील” असा विश्वास नितीन गडकरी यांनी अंदाज व्यक्त केला आहे.

Leave a comment

0.0/5